मैत्री ...
तिची नी माझी !!
तिची माझी गोष्ट जरा वेगळीच आहे ,
म्हणायलां मैत्री पण जगावेगळी कहाणी आहे !
दररोज रुसवाफुगवी अन वादावादी आहे ,
म्हणायला जिवलग पण विळा-भोपळ्याची जोडी आहे !
दुर कोसांवर दोघांची घरटी आहेत ,
दिसायला विभक्त पण मनाने एकरूपी आहे !
एकत्र येण्यासाठी नाना खटाटोपी आहेत
भेटल्यावर अळीमिळी पण जन्माची गट्टी आहे !
खरंच सांगतो तुम्हाला अनोखी भट्टी आहे
दूर एकमेकांपासून आहे पण अगदी जिवलग अशी मैत्री आहे ..!!
No comments:
Post a Comment